Breaking News

रोहा शहर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र चाळके

रोहे : प्रतिनिधी

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शहर अध्यक्षपदी रवींद्र चाळके यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश कोळी व खजिनदारपदी महेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेची  बैठक शुक्रवारी (दि. 3) येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संघटनेच्या रोहा शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात हर्षद राम साळवी, प्रेषित कुमार बारटक्के, मनोहर धाटावकर, गीतराज म्हस्के (सर्व उपाध्यक्ष), संदेश सरणेकर, भाई  सुर्वे, जितेंद्र साळुंखे (सर्व सहसचिव) यांचाही समावेश आहे. सूर्यकांत कोलाटकर, विनायक चिखलकर, संतोष हातकमकर, शेखर सकपाळ, अमित पवार यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष सुरेश मगर, सरचिटणीस महादेव सरसंबे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, सल्लागार काशिनाथ धाटावकर, नगरसेवक महेश कोलाटकर, संघटनेचे तालुका सहसचिव महेश बामुगडे, सदस्य मंगेश रावकर, प्रफुल्ल पडवळ, अमित मोहिते, लक्ष्मण मोरे, अरविंद मगर, राजु कोळी, विनोद कोळी, सागर बोबडे, महेश मोहिते या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply