टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो पॅरालिम्पिकच्या रविवारी (दि. 5) समारोपाच्या दिवशी भारताची घोडदौड कायम राहिली आणि बॅडमिंटपटू कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तत्पूर्वी बॅडमिंटनमध्येच सुहास यथिराजने रौप्यपदक पटकाविले. यासोबतच भारताची एकूण पदकसंख्या 19 झाली. ही भारताची आजवरची सर्वोच्च कामगिरी आहे. कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याआधी विश्वविजेत्या प्रमोद भगतने शनिवारी पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल 3 क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली, तर मनोज सरकारने कांस्यपदक जिंकत हा आनंद द्विगुणित केला होता. उपांत्य लढत गमावल्यामुळे कांस्यपदकाची लढत खेळणार्या तरुण ढिल्लाँ याच्याकडून एका पदकाची अपेक्षा होती, मात्र पराभव झाल्याने ही संधी हुकली. याआधी सुहास यशिराजने समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकले. सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावे लागलशे. सुहास यथिराज आयएएस अधिकारी आहे. कर्नाटकमध्ये जन्म झालेला सुहास यथिराज उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे.