Breaking News

माणगाव रोटरी क्लबतर्फे मास्कवाटप

माणगाव : प्रतिनिधी

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ माणगाव यांनी शुक्रवारी (दि. 20) मास्कचे वाटप केले. जनतेशी सतत संपर्क असणारी माणगावातील शासकीय-निमशासकीय कार्यालये, बसस्थानक, विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना रोटरी क्लबतर्फे शुक्रवारी मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. मोहन मेथा, सचिव बिपीन दोशी, माजी अध्यक्ष हेमंत शेट, विक्रांत सप्रे, डॉ. श्रीकांत वैद्य, अमोल कुलकर्णी, दिनेश मेथा, नितीन मेथा, अ‍ॅड. योगेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.

नगरपंचायतीकडून स्वच्छतेवर भर  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माणगाव नगरपंचायतीने गटारांतून कीटकनाशक  औषधे फवारणीचे काम हाती घेतले आहे. कोरोनामुळे नगरपंचायतीने  स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी सफाई कामगारांना वेळोवेळी दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.  स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply