Breaking News

मुरूड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर शिंदे

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत राहणारे भाजपचे तरुण कार्यकर्ते समीर भारत शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या मुरूड तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुधागड, पाली येथील जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

ग्रामीण भागात पक्षाचे काम करीत असताना समीर शिंदे यांनी तालुक्यातील अनेक समस्या सोडवत, आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचे सहकार्य घेऊन जनमानसात आपली उत्तम प्रतिमा तयार केली आहे. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सतीश धारप, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, सरचिटणीस नरेश वारगे, मुरूड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर आदी उपस्थित होते.

शिंदे यांची निवड जाहीर होताच भाजपच्या विविध पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply