Breaking News

सुधागडातील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्याच्या जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी गुरुवारी (दि. 16) पोलिसांनी उद्ध्वस्त केली. याबरोबर सापडलेला मुद्देमालदेखील नष्ट करण्यात आला.

पाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मनोहर म्हात्रे, पोलीस नाईक कांचन भोईर व शिपाई रामसेवक कांदे यांनी गुरुवारी पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात छापा टाकून एक बेवारस गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली. या वेळी पत्र्याची एक टाकी व प्लास्टिकचे चार ड्रम, गूळ व नवसागर मिश्रित रसायन व दारूनिर्मिती साहित्य जप्त केले. या मालाची एकूण किंमत अंदाजे 8600 रुपये आहे. दारू व दारूनिर्मितीचे रसायन जमिनीवर ओतून त्याचा जागेवरच नाश करण्यात आला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply