मुरूड : प्रतिनिधी
रोह्यातील दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेने जिल्हा शासकीय रक्तकेंद्राच्या सहकार्याने चणेरे येथील कुणबी समाज हॉलमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ यांनी केले. या वेळी चणेरा सरपंच प्रसन्ना सिनकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष भोईर, तसेच काशिनाथ भोईर, जलील धनसे, नरेश देवळे उपस्थित होते. दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष महादेव मोरे, सदस्य मयूर विचारे, राजेश घोसाळकर, जनार्दन पाटील, अनिल भोईर, समीर वाडेकर, महेंद्र पाटेकर यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.