महाड : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाड येथील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाड भाजप मंडळाच्या वतीने तालुक्यातील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट वाटप करण्यात आले, तसेच तेथील आदिवासी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्या डॉ. मंजुशा कुद्रीमोती, महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे, निलेश तळवटकर, तुषार महाजन, उपविभागाध्यक्ष राजू पार्टे, वाहतूक सेलचे अध्यक्ष नाना पोरे आदी उपस्थित होते.