Breaking News

आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार

नवीन पनवेल सेक्टर 5 डी मार्टसमोर व सेक्टर 1 परिसरात आठवडा बाजारामध्ये शुक्रवारी (दि. 27) येथून एका व्यक्तीच्या खिशातून 12 हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला आहे. यापूर्वीदेखील या बाजारात आलेल्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दर शुक्रवारी डी मार्टसमोर आठवडा बाजार भरतो. 27 डिसेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास नवी मुंबई एनएमएमटीचे कंट्रोलर विष्णू मारुती वायभासे (48) हे भाजी खरेदी करण्यासाठी गेले असता, त्यांच्या खिशातील 12 हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी या बाजारातून चोरून नेला आहे. अशा अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना या आठवडी बाजारात यापूर्वीदेखील घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत या बाजारात एका महिलेची पर्स चोरीला गेली, तर एका रिक्षाचालकाला एका हजार रुपयांना फसविण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा चोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply