Breaking News

दीपक सिंगचा ‘गोल्डन पंच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय विजेता दीपक सिंग याने इराणच्या चाबहार येथे संपलेल्या मकरान कप बॉक्सिंग स्पर्धेच्या 49 किलो गटात सुवर्ण पटकविले. अन्य पाच बॉक्सर अंतिम लढतीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यवर समाधान मानावे लागले. दीपकने निर्णायक लढतीत जाफर नसिरीवर मात केली.

अंतिम लढत गमावणार्‍या अन्य खेळाडूंमध्ये पी. ललितप्रसाद (52 किलो), राष्ट्रकुल रौप्य विजेता मनीष कौशिक (60), दुर्योधनसिंग नेगी(69 किलो), संजीत (91) व राष्ट्रकुल रौप्यविजेता सतीश कुमार (91 किलोहून अधिक) यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय विजेत्या मनीषला डॅनियल शाह बक्श याने; तर सतीशला मोहम्मद मलियासने हरविले. संजीतला एल्डिन घोसोन याने नमविले. प्रसादला ओमिदा साफा अहमेदी व दुर्योधनला सज्जाद केजिमकडून मात मिळाली.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply