पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 10) दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 88 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, खालापूर तालुका भाजपचे अध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे आदींसह पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक येथे तलाव सुशोभिकरण (30 लाख रुपये), चौक तारापूर येथे सभागृह बांधणे (10 लाख रुपये), चौक येथील मोर्बे गावातील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (8 लाख रुपये) या विकासकामांचे भूमिपूजन, चौक येथील शिवसेना शाखा ते संतोष हातमोडे यांच्या घरापर्यंतचा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (5 लाख रुपये), चौक येथील मुरली साखरे यांच्या घरापासून ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंतचा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (2 लाख 99 हजार), चौक नानिवली आदिवासी वाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (4 लाख रुपये) या विकासकामांचे, तसेच चौक ग्रामीण रुग्णालयासाठी यंत्रसामग्री व साहित्य (33 लाख 50 हजार रुपये) लोकार्पण होणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …