Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील दोन दिवसीय प्रदर्शनी

खारघरमध्ये परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
सेवा व समर्पण अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन खारघरमध्ये करण्यात आले आहे. लिटील वर्ल्ड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनीमधून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन केले.
सेवा व समर्पण अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी खारघर मंडलातर्फे लिटील वर्ल्ड मॉलमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तसेच या वेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, अ‍ॅड. नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस कीर्ती नवघरे, दीपक शिंदे, भाजप युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल अध्यक्ष विनोद घरत, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मोना आडवाणी, विपुल चौटालिया. संजय घरत, शोभा मिश्रा, संजय बागडे, अक्षय पाटील, व्यापारी सेल संयोजक अंबाभाई पटेल, चांदणी अवघडे, विजय बागडे, रमेश रमण, काशीनाथ घरत, सुश्मीत डोलस आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …

Leave a Reply