Breaking News

इंग्लंड वि. न्यूझीलंड : पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार

ऑकलंड : वृत्तसंस्था

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. 10) पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगला, ज्याने वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून दिली. पावसामुळे खोळंबा झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर 3-2ने मात केली. पावसामुळे हा सामना 11 षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 5 बाद 146 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडनेही सात बाद 146 धावाच केल्या, ज्यामुळे धावसंख्या बरोबरीत सुटली आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा

थरार रंगला.

धावसंख्या बरोबरीत सुटल्यामुळे पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा सामना झाला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टॉ आणि कर्णधार इयॉन मॉर्गनने 17 धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार टीम सौदीने गोलंदाजी केली, तर न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल, टीम सेफर्ट आणि कोलिन डी ग्रँडहोमने एका षटकात केवळ आठ धावा केल्या आणि सामनाही गमावला. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टीम सेफर्टने ख्रिस जॉर्डनचा पहिला चेंडू खेळला व दोन धावा काढल्या. पुढच्या चेंडूवर चौकार लगावला. नंतर मात्र त्याला एक धावही काढता आली नाही आणि त्यानंतर सेफर्ट बाद झाला. आता न्यूझीलंडला अखेरच्या दोन चेंडूंत 10 धावांची आवश्यकता होती, मात्र गप्टिलला केवळ एकच धाव काढता आली, ज्यामुळे न्यूझीलंडने सामना गमावला.

मुख्य सामन्यात बेअरस्टॉने 18 चेंडूंत 47 धावांची शानदार खेळी केली. तो सामनावीर ठरला, तर न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 20 चेंडूंत 50 धावा करून आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply