जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
रोहे ः प्रतिनिधी
येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कला महाविद्यालयातील 96च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 16 ते 17 ऑक्टोबरदरम्यान खांब येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात वाणिज्य व कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे एकत्रित आलेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयातील 96च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात आठवणीचा कट्टा या कार्यक्रमात आपल्या शालेय आठवणी सांगितल्या. एकमेकांबद्दलची सध्यस्थिती जाणून घेतली. सचिन शिंदे, सतिष महाडिक, रूपेश पाटील, महेंद्र दिवेकर, कृष्णा मोरे, सविता देशपांडे, टी. टी. सुरज या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात 40 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.