Breaking News

दिवाळी संध्याने कर्जतकर झाले मंत्रमुग्ध, नवोदित कलाकारांनी केली कमाल; श्रोते सुखावले

कर्जत : प्रतिनिधी

शहरातील नानामास्तर नगरमध्ये दिवाळी संध्याच्या निमित्ताने यशोदीप कला मंचच्या नवोदित गायक कलाकारांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतमधील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या वेळी संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नानामास्तर नगरमधील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या प्रांगणात माजी सरपंच मनोहर पाटील यांनी यशोदीप कला मंचच्या सहकार्याने दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिक गोविंद दिघे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply