पनवेल ः मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रांतधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विजय तळेकर, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ होते. वेळी सकारात्मक चर्चा झाली. डुंगी गावच्या समस्येसंदर्भात 26 जुलै रोजी जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेण्यात ठरले.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …