Breaking News

गोशीन रियूच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

उरण ः प्रतिनिधी

जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत आर्मीचर किक बॉक्सिंग असोशिएशन वाको गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात भाग घेतला होता. त्यामध्ये अनेकांनी घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेत अनिश पाटील, अमिता घरत, अमिषा घरत, रोहित घरत, समीक्षा पाटील, नेहा पाटील, सुजित पाटील, अर्णव पाटील, शुभम ठाकूर यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यांची अहमदनगर येथे 23 व 24 ऑक्टोबर रोजी होणार्‍या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय तमन्ना गावंड, श्रुती म्हात्रे, श्लोक ठाकूर यांनी रौप्यपदक, तर अंश म्हात्रे व अमर घरत यांनी कांस्यपदक जिंकले. या वेळी तिथे जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात आली. त्यात अमिता घरत, अमिषा घरत, अनिश पाटील, मानसी ठाकूर, रोहित घरत, शुभम ठाकूर, गोपाळ म्हात्रे, संतोष मोकल, शुभम म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, कंकेश गावंड, प्रीतम मोकल उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना राकेश म्हात्रे, गोपाळ म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply