Breaking News

‘आयईडी’पेक्षा व्होटर आयडी अधिक शक्तिशाली : नरेंद्र मोदी

अहमदाबाद : वृत्तसंस्था

आयईडी हे दहशतवादाचे शस्त्र असते; तर व्होटर आयडी हे लोकशाहीचे शस्त्र आहे. आयईडीपेक्षा लोकशाहीचे शस्त्र असलेले व्होटर आयडी कैकपटीने शक्तिशाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 23) केले अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर ते बोलत होते. मतदारांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या शस्त्राचा वापर करून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील केंद्रावर मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हे शतक पहिल्यांदा मतदान करणार्‍यांचे आहे. आपला देश लोकशाहीच्या श्रेष्ठत्वाचे उदाहरण जगाला देतो, असे सांगत मोठ्या संख्येने नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मोदींनी केले.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी आई हीराबेन यांचे आशीर्वाद घेतले. मग अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply