Breaking News

अभिनेता सनी देओल भाजपमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत अभिनेता सनी देओल याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याला पंजाबच्या गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सनी देओलने गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राजकीय वर्तुळात सनीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच, मंगळवारी (दि. 23) त्याने संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply