पनवेल : प्रतिनिधी
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यभरात 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय दक्षता आयोग, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेत या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत उपायुक्त विठ्ठल डाके यांनी पनवेल महापालिका मुख्यालयातील अधिकार्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली. हा सप्ताह स्वतंत्र भारत 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणार्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपतप्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्यात यावा. या आशयाचे फलक पालिकेच्या इमारतीवर दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.