Breaking News

पनवेल शहरात होणार जलशुद्धीकरण केंद्र; स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जुने पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या अतिरिक्त बाबींच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. आहे. त्यामुळे पनवेलकरांना शुध्द पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 29) स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी स्थायी समितीचे सदस्य तसेच उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम भोईटे, लेखाधिक्षक विनयकुमार पाटील तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या सभेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जुने पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविणेच्या अतिरिक्त बाबींच्या खर्चास व पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी, उद्यान, सार्वजनिक  बागेत व महापालिका सुचित करेल त्या ठिकाणी कचराकुंडी, आसनव्यवस्था कामी बाकडे, उद्यानातील खेळणी व उद्यानात व्यायामाचे साहित्यांचा पुरवठा करुन बसविणेकरिता मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.3 चे अं.भु.क्र.127 अ मध्ये नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, धोकादायक बांधकामे निष्कासित करण्याच्या कामी तीन वर्षाच्या कालावधीसाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री व वाहने पुरविणे कामी ऑनलाइन ई-निविदेस मंजुरी मिळण्याबाबतच्या विषयास मंजूरी देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या मुदतपुर्ती झालेल्या मुदतठेवींची नव्याने राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेवीत गुंतवणूक करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. पनवेल मनपा हद्दीतील शौचालयांची साफसफाई करण्याबाबतच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेस विविध क्षमतेच्या एलईडी पथदिव्यांचा दोन वर्षांकरीता पुरवठा करणे या कामी प्राप्त न्युनतम दराच्या निविदेस मान्यता मिळणेबाबतचा विषय स्थगित करण्यात आला.पनवेल महापालिकेसाठी कोविड-19 कामी महापालिकेचे मंजूर ठेकेदार जे. के. टुरिस्ट अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट यांचेमार्फत वाहने भाडेतत्वावर घेणेकामी करण्यात आलेला खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषय स्थगित करण्यात आला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply