पनवेल ः रामप्रहर वृत्त
बदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. मानवी जीवनात, समाजात सातत्याने बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दै. रामप्रहरचा दिवाळी विशेषांक वाचनीय आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) पनवेल येथे काढले.
‘स्थित्यंतर’ या दै. रामप्रहरच्या दिवाळी विशेषकांचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
प्रकाशन समारंभाला ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, उपसंपादक समाधान पाटील, संदीप बोडके, तन्वी गायकवाड, आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, प्रवीण गायकर, रूपेश चिंगळे, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी आदी उपस्थित होते.
‘रामप्रहर’च्या दिवाळी विशेषांकात लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे जीवनकार्य आणि नवी मुंबई विमानतळ यांचा वेध घेणारा विशेष लेख आहे. याशिवाय पनवेल, रायगडसह विविध क्षेत्रांतील स्थित्यंतरांचा आढावा घेण्यात आला आहे तसेच कथा, कविता, व्यंगचित्रेही आहेत. याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक
आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …