Breaking News

कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत वाघोडे संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी

आरसीएफ थळतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत जयान हनुमान वाघोडे संघाने विजेतेपद पटकावले. सुकेळी रोहा संघ उपविजेता ठरला. जय  सोंडाई प्रसन्न-पाली व काजव्याची वाडी यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला. जय  हनुमान-वाघोडे संघाचा दया नाईक याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट  पकडीचे पारितोषिक सुकेळी-रोहा या संघाचा सचिन जयवंत हंबीर याला देण्यात आले. उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक जय हनुमान-वाघोडे संघाचा अविनाश अशोक लेंडी याला देण्यात आले. या वेळी उत्कृष्ट  पकड सचिन हंबीर, सुकेळी-रोहा, उत्कृष्ट  चढाई अविनाश अशोक लेंडी, जय हनुमान-वाघोडे, अष्टपैलू खेळाडू दया नाईक, जय हनुमान-वाघोडे यांना वैयक्तिक पारितोिएके मिळाली.

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आरसीएफ थळतर्फे कामगार स्मृतिचषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आरसीएफ क्रीडासंकुल कुरूळ येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जय हनुमान वाघोडे आणि सुकेळी रोहा यांच्यात अंतिम सामना झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात वाघोडे संघाने सुकेळी रोहा संघावर 23-7 अशी मात केली. उपांत्य फेरीत सुकेळी रोहा संघाने काजव्याचीवाडी संघावर विजय मिळवला. दुसर्‍या उपांत्य लढतीत जय हनुमान वाघोडे संघाने जय सोंडाई प्रसन्न-पाली संघाचा परभाव केला.

आरसीएफ थळचे सीजीपी महाव्यवस्थापक  एस. एम. दहिवले, मानव संसाधन मुख्य व्यवस्थापक सी. व्ही. तळेगावकर, प्रशासन मुख्य व्यवस्थापक व्ही. जी. देशपांडे, प्रशासन वरिष्ठ व्यवस्थापक एस. डी. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक आर. पी. जावळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मानव संसाधन महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी आरसीएफ थळमध्ये कार्यरत सर्व संघटनांचे व असोसिएशनचे पदाधिकारी, मान्यवर पत्रकार, आरसीएफचे कर्मचारी आणि कबड्डीप्रेमी या वेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. जनसंपर्क वरिष्ठ व्यवस्थापक पुरुषोत्तम तडवळकर यांनी सूत्रसंचालन केले.  

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply