Breaking News

खारेपाटामधील भुवनेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा

खारेपाट ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील खारेपाट येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या पुरातन श्री भुवनेश्वर मंदिराला शासनाच्या पर्यटन विकास विभागातर्फे पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री भुवनेश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

या पर्यटन स्थळाचा क वर्गाच्या पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिर आणि परिसराचा उत्तम विकास होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. या मान्यतेचे पत्र नुकतचे ग्रामस्थांना सूपूर्द करण्यात आले. श्री क्षेत्र भुवनेश्वर हे तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने पर्यटकांची वर्दळ असते. मात्र येथे पर्यटकांसाठीच्या सुविधांची वानवा आहे.  अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर धार्मिक स्थळांचीही आहे. यासाठी भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार पविण दरेकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून भविष्यात हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जाईल त्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती.

विशेष म्हणजे खारेपाटातील श्री क्षेत्र भुवनेश्वराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळून दिल्याबद्दल भुवनेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिपक पाटील व सर्व पदाधिकार्‍यातर्फे शासनाचे आभार मानण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply