Breaking News

रणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. होय, रणवीरचा ‘गली बॉय’ रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 70 कोटींचा आकडा पार केलाय.

ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 19.40 कोटींची कमाई केली. दुसर्‍या दिवशी 13.10 कोटींचा गल्ला जमवला. यानंतर शनिवारी 18.65 कोटींचा आकडा पार केला आणि रविवारी 21.30 कोटींचा बिझनेस करत थेट 72.45 कोटींपर्यंत मजल मारली. केवळ चार दिवसांत 70 कोटींची कमाई करणार्‍या ‘गली बॉय’ने याच आठवड्यात 100 कोटींचा आकडा गाठला तर नवल वाटायला नको.

‘गली बॉय’ हा रणवीरचा सलग तिसरा हिट चित्रपट आहे. गतवर्षी त्याचे ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ असे  दोन चित्रपट रिलीज झालेत आणि या दोन्ही चित्रपटांनी धुवाँधार कमाई केली. आता रणवीरचा तिसरा चित्रपट ‘गली बॉय’ हाही सुपरडुपर हिट ठरतोय. मुंबईच्या एका सामान्य रॅपरच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट विदेशातही बक्कळ कमाई करतोय. रणवीरने यात शानदार अभिनय केला आहे. रणवीरच्या अपोझिट दिसलेली आलिया भट्ट हिनेही दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इतकी की ‘गली बॉय’ हा रणवीर व आलियाच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट आहे, असे समीक्षकांनी म्हटले आहे. दिग्दर्शिका झोया अख्तरने या चित्रपटात धारावीत जगणार्‍या मुलांची कथा पडद्यावर चितारली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply