पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 5) साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काळुंद्रे येथे भाजपच्या वतीने गरजू नागरिकांना मोफत रेशन किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, वॉर्ड क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, काळुंद्रे गाव अध्यक्ष बाळाराम चिखलेकर, माजी सदस्य डी. एस. घरत, सचिन चिखलेकर, बुथ अध्यक्ष विशाल म्हस्कर, संजय चिखलेकर, किरण बहिरा, विनोद परदेशी, नितेश बहिरा, अफताब ताडे, भुशन पिल्ले, सविता घरत, हरिचंद्र परदेशी, जयदास गोंधळी, जतू खुटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.