Breaking News

सिंधुदुर्गात वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे मंगळवार (19 फेबु्रवारी)पासून  47वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चार दिवस चालणार्‍या या स्पर्धेत भारतातून 25 राज्य व 13 संस्थांच्या तब्बल 288 पुरुष व 195 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. भारतातून जवळपास 40 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच तसेच प्रशिक्षक व राष्ट्रीय व राज्य संघटनेचे अधिकारी असे मिळून एकंदर 650 जणांचा चमू या

स्पर्धेकरिता कुडाळमध्ये दाखल होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर हे या स्पर्धेला हजर राहणार आहेत. अखिल भारतीय महासंघ आयोजित या स्पर्धेचे यजमानपद यंदा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनला मिळाले आहे. विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे व महिला विश्वविजेती एस. अपूर्वा हे या स्पर्धेचे मुख आकर्षण असून, त्यांच्यासोबत माजी विश्वविजेते आर. एम. शंकरा (एअर इंडिया), रश्मी कुमारी, योगेश परदेशी व आय. इलवझकी (सर्व पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड)बरोबरच जवळपास 20 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

यामध्ये रियाझ अकबरअली, एम. नटराज (एअर इंडिया), काजल कुमारी, एस. श्रीनिवास, महम्मद घुफ्रान, रमेश बाबू, परिमला देवी (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), अनुपमा केदार, नागसेन एटंबे, राजू कटारे, संजय नागावकर (बँक ऑफ इंडिया), राजू भैसारे, जितेंद्र काळे (कॅग), परिमी निर्मला, प्रकाश गायकवाड (भारतीय आयुर्विमा महामंडळ), आयेशा महम्मद (जैन इरिगेशन), झहीर पाशा, संगीता चांदोरकर, कविता सोमांची, हिदायत अन्सारी (रिझर्व्ह बँक) या प्रमख खेळाडूंचा समावेश आहे.

पुढील वर्षी मलेशिया येथे कॅरमची पाचवी विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा होणार असल्याने संघ निवडीसाठी या स्पर्धेची कामगिरीही विचारात घेतली जाणार असल्याचे अखिल भारतीय कॅरम महासंघ महासचिव भारतीय नारायण यांनी सांगितले.

Check Also

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान लवकरच ई-वॉटर टॅक्सीसेवा होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर …

Leave a Reply