Breaking News

म्हावरा घटल्याने खवय्ये नाराज ; ताज्या मासळीचा भाव गगनाला

श्रीवर्धन : प्रतिनिधी

खराब हवामानामुळे मागील काही दिवसांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनासी झाली आहे. पाच ते सहा दिवसाची वस्ती करूनसुध्दा खोल समुद्रात पुरेशी मच्छी मिळत नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागातील मच्छिमारी नौका किनार्‍याला साकारलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आवक घटून मच्छीचे भाव गगनाला भिडले आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे 1000ते 1200मच्छिमारी नैाका आहेत. त्यातील बहुतांशी नौका तालुक्यामधील दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरटखोल, शेखाडी, वाळवटी, जीवना बंदर, मुळगाव कोळीवाडा, दांडा तक्का कोळीवाडा, बांगमाडला आदी भागतील किनार्‍यावर नांगरून ठेवल्या आहेत.

समद्रात मासळी मिळण्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहणे खुप आवाश्यक असते, परंतु सध्या दक्षिणेकडुन व उत्तरेकडून वाहत वारे आहेत. हवामानातील बदलामुळे खोल समुद्रातील मासळी दुरवर निघून गेली आहे. त्यामुळे मासळी मिळनाशी झाली आहे. खोल समुद्रात जाऊनही मासळी मिळत नसल्याने कोळी समाज नाराज आहे.

श्रीवर्धन तालुका पर्यटकांचे माहेरघर समजले जाते. येथे शुक्रवार, शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र आवक घटल्याने मासळीचे भाव कमालीचे वधारले असून, जास्त पैसे खर्चून पर्यटकांना मासळी खरेदी करावी लागत आहे. मासळीचे भाव अधारल्याचा फटका स्थानिक नागरिकांनासुध्दा सहन करावा लागत आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये बांगडा, सुरमई, पापलेट, रावस, बांगडा, ढोमा, लेपा काही प्रमाणामध्ये मिळणारी कोळंबी हिच मासळी नजरेस पडत आहे. मात्र ती खुप अल्प प्रमाणामध्ये मिळत असलयाने फारच महाग पडत आहे. एलईडी मच्छिमारीमुळे पारंपारिक जाळयाने मच्छिमारी करणार्‍या कोळी बांधवांवर उपसमारीची स्थिती आली आहे. त्यातच सध्या हवामानातील फरकामळे समुद्रात मासळी मिळण्याचे प्रमाण फार अल्प झाले आहे. मच्छि मिळत नसल्यामूळे मच्छिमार आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply