Breaking News

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान

अलिबाग ः प्रतिनिधी

ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आरोग्य, व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत समाजाला निरुपणाच्या माध्यमातून चांगले विचार देणारे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे अलिबाग तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळपासूनच श्रीसदस्य हातामध्ये झाडू, पंजे, फावडे, कोयते घेऊन टेम्पो, टॅक्टरसह अभियानात सहभागी झाले होते. या वेळी

अलिबाग-नागाव-रेवदंडा व अलिबाग-बेलकडे-सहाण-नागाव या रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडूपे, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या उचलून रस्ता दुतर्फा स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता अभियानामध्ये एकूण 2035 श्रीसदस्यांनी 66 किमी रस्ता दुतर्फा स्वच्छ केला असून त्यातून 72 टन कचरा गोळा करण्यात आला. या कचर्‍याची कुरूळ व सहाण येथील डंम्पिग ग्राऊंड जागेत योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी टेम्पो, ट्रॅक्टर, डम्पर व जेसीबी अशा  एकूण 65 वाहनांचा वापर करण्यात आला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply