पनवेल : रामप्रहर वृत्त
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे वार्षिक हिवाळी शिबिर दि. 7 ते 10 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे झाले. या शिबिरात कराटे, किकबॉक्सिंग, योगा, जलतरण आदी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच परीक्षण करण्यात आले.
या शिबिरात खांदा कॉलनी शाखेतील दोन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या दोनही खेळाडूंनी बेल्ट टेस्टमध्ये उत्तम कामगिरी करत प्रावीण्य मिळवले. यामध्ये राजेंद्र कन्हेरे याला किकबॉक्सिंग क्रीडा प्रकारात एक डिग्री ब्लॅक बेल्ट आणि कराटेमध्ये गोल्डन ब्राऊन बेल्ट, तसेच अथर्व मसुरकर याला पर्पल बेल्ट मिळून बेस्ट एंटरटेन्मेंट अवॉर्ड मिळाला. याबद्दल युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर आणि सर्व प्रशिक्षक पदाधिकारी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Check Also
‘नैना’साठी शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका
आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना …