Breaking News

पनवेलमध्ये निराधार, विधवा महिलांना मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील श्री साई नारायणबाबा मंदिरातील श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील निराधार व विधवा महिलांना गुरुवारी (दि. 11) धान्याचे वाटप करण्यात आले.

या चॅरिटेबल ट्रस्टचे रामलाल चौधरी तसेच दुबई येथील नारायणबाबा भक्त अजुन आसवानी यांच्यामार्फत 140 महिलांना धान्याचे वाटप करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या संस्थेमार्फत साई मंदिरातून अशा प्रकारे महिलांना धान्याचे वाटप करण्यात येते. यासाठी त्यांच्या रेशनकार्डची नोंद करण्यात येते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना दररोज मोफत दुध व नाष्टा, शिक्षण, औषध याचे वाटप करण्यात येते.

संस्थेच्या माध्यमातून अनेक जणांची सामुहिक विवाह येथे लावण्यात आले आहेत. तसेच कोरोना काळामध्ये शासनाला आर्थिक मदत सुद्धा केली आहे. विविध सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत सातत्याने राबविण्यात येत असतात.

Check Also

खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद

खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …

Leave a Reply