Breaking News

रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत मिळणार

मुंबई : गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील दहावी-बारावीसाठी mahahsscboard.in, दहावीसाठी https://feerefund.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून/लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply