Breaking News

मुरूड तहसील कार्यालयासमोर बाणकोटकर यांचे उपोषण सुरू

मुरूड : प्रतिनिधी

एफआरआयमध्ये असलेल्या सर्व आरोपींची नावे न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात समाविष्ट करावीत, या मागणीसाठी राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास बाणकोटकर यांनी सोमवार (दि. 15)पासून मुरूड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हरिदास बाणकोटकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी राजपुरी कोळीवाड्यातील काही ग्रामस्थांनी हल्ला करून अंगणातील वस्तू समुद्रात फेकून दिल्या होत्या, तर काही वस्तू चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार मुरूड पोलीस ठाण्यात 80 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी मुरूड दिवाणी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आहे. एफआरआयमधील 80पैकी फक्त 38 आरोपींची नावे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात असून त्यात 13 मुख्य आरोपींची नावे समाविष्ट करावीत या प्रमुख मागणीसाठी फिर्यादी हरिदास बाणकोटकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी मुरूड पोलिसांना पत्र पाठविण्यात आले असून बाणकोटकर यांना उपोषणापासून परावृत्त करण्यास सांगितले असल्याचे नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी सांगितले.

फिर्यादी बाणकोटकर यांनी दिलेले मोबाइल चित्रीकरण पाहूनच आम्ही आरोपींची संख्या निश्चित केली आहे. बाकीच्या आरोपींविरुद्ध सबळ पुरावा सापडत नसल्याने त्यांची नावे दोषारोपपत्रात दाखल करण्यात आलेली नाहीत. 38 आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हरिदास बाणकोटकर प्रशासनास वेठीस धरत असतात.

-परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, मुरूड

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply