अलिबाग : प्रतिनिधी
शेतकारी कामगार पक्षाचे माजी अमादर विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात जेलमध्ये आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी आमदार जयंत पाटीलदेखील लवकरच जेलमध्ये जातील. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. विधीमंडळाच्या आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात जयंत पाटलांचा हिशेब मांडणार, असा इशारा अलिबागमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीचे निवनिर्वाचित सरपंच गणेश गावडे व नवगाच्या सरपंच प्रियांती घातकी तसेच आघाडीच्या सर्व उमेदवारांचा सत्कार समारंभ वेश्वी येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभात आमदार महेंद्र दळवी बोलत होते.
शेकापचे नेते आमदार जयंत पाटील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जीवावर उड्या मारतात. या बँकेत मोठा घोटाळा झाला आहे. सुमारे 425 कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. ते कुणाच्या नावने पाठवले आहेत, कसे पाठवले आहेत, याचे पुरावे माझ्याकडेे आहेत. त्यामुळे लवकरच आमदार जयंत पाटील जेलमध्ये असतील, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले.
आमदार जयंत पाटलांची राजकीय घटिका भरत आली आहे. जयंत पाटील यांनी आतापर्यंत अनेकांना देशोधडीला लावले आहे. आतपर्यंत त्यांनी जेवढे अन्याय केले आहेत त्या सर्वांचा हिशेब चुकता करणार. इतरांना देशोधडीला लावणार्या जयंत पाटलांना मी रस्त्यावर आणणार, असा इशारा अमदार महेंद्र दळवी यांनी दिला. वेश्वी ग्रमापंचायत ही आमदार जयंत पाटील यांचे निवासस्थान असलेली ग्रामपंचायत आहे. तीच आम्ही जिंकली आहे. शेतकरी भवनमध्ये बसून महाराष्ट्राला शहाणपण शिकवणार्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवामुळे घरात गोधडी घेऊन झोपण्याची वेळ आली आहे, अशी टिका आमदार महेंद्र दळवी यांनी केली.
या वेळी मानसी दळवी, अदिती दळवी, माजी सरपंच नारायण वार्डे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, राष्ट्रवादीचे अमित नाईक, ॠषिकेश भगत, आशिष भट, सुरेश म्हात्रे, चारू मगर, सुधीर वेंगुर्लेकर, नंदकुमार कदम, अर्जुन पाटील, सुनिल गुरव, भालचंद्र गावडे, भगवान गावडे, विग्नेश माळी आदी उपस्थित होते.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper