अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. सन 2018मध्ये या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळी राजेश सुर्वे यांच्या खांद्यावर संघटनेची धुरा सोपवण्यात आली होती. तीन वर्षांत संघटनेने प्रभाव दाखवून दिला. विद्यमान कार्यकारिणीची मुदत येत्या 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. संघटनेचे तिसरे राज्यव्यापी अधिवेशन 13 व 14 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे झाले. यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक नेते रोहकले गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. सुर्वे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 9 डिसेंबर रोजी आमदार केळकर व डॉ. रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या वेळी जाहीर करण्यात आला. राज्य कार्यकारणीच्या वतीने जिल्हा व तालुकास्तरावर संपर्क अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांशी संपर्क साधून अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सुर्वे यांनी सांगितले. शिक्षक नेरे रोहकले गुरूजी यांनी आंतरजिल्हा बदली, पती-पत्नी एकत्रीकरण, डीसीपीएस, एनपीएस शिक्षकांसाठी आंदोलनाची दिशा ठरविणे व संघटन वाढीसाठी कार्यकर्ता मेळावा व संपर्क अभियानावर भर देण्यात यावा. नव्याने शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रयत्न केले जावे याविषयी मार्गदर्शन केले.
अशी आहे नवीन कार्यकारिणी : राज्य अध्यक्ष : राजेश सुर्वे, कार्यवाह : संजय पगार, राज्य सल्लागार : सुधाकर मस्के, कार्यकारी अध्यक्ष : मधुकर उन्हाळे, कार्यकारी अध्यक्ष : प्रकाश चतरकर, कोषाध्यक्ष : पुरुषोत्तम काळे, संघटनमंत्री : सुरेश दंडवते, कार्याध्यक्ष : भरत मडके, बाबुराव गाडेकर, बाबूराव पवार, प्रकाश चुनारकर, डॉ. सतपाल सोवळे, संपर्क प्रमुख : राजेंद्र नांद्रे, सहसंपर्कप्रमुख : दिलीप पाटील, उपाध्यक्ष : संजय शेळके, अविनाश तालापल्लीवार, सुनील केने, विजय पाटील, कार्यालयीन चिटणीस : भगवान घरत, प्रसिद्धीप्रमुख : रविकिरण पालवे, महिला आघाडी प्रमुख : वैशाली कुलकर्णी, दीपिका चौरे, छाया पाटील.