Breaking News

माणगाव वडघर येथे जैवविविधता संवर्धन कार्यशाळा

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये नुकतीच ’जैवविविधता संवर्धन’ विषयक दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा 36 एकराचा परिसर विविध नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. या परिसरात स्थानिक वृक्षांच्या सुमारे 65 प्रजाती आणि 45 ते 50 प्रकारचे पक्षी आढळतात. हा परिसर वर्षभर विद्यार्थी, युवक, पर्यटकांनी गजबजलेला असतो. विविध शिबिरासाठी येणार्‍या विद्यार्थी, युवकांना येथील जैवविविधतेचा आनंद लुटता येतो, निसर्ग, पर्यावरण चक्र समजून घेता येते. याचाच विस्तार करून जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राचे स्वरूप कसे असावे याबद्दल या कार्यशाळेत सविस्तर मांडणी आणि चर्चा झाली. तसेच समाजात जैव विविधतेविषयी जागरूकता आणि भान निर्माण व्हावे या हेतुने या जैवविविधता संवर्धन केंद्राची उभारणी केली जावी, असे यावेळी झालेल्या चर्चेतून पुढे आले.

वनस्पती आणि तत्सम शास्त्राचे हजारो विद्यार्थी कोकणातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. शालेय अभ्यासक्रमात सुद्धा जैवविविधता या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्रा सोबतच पर्यावरण चक्रातील पक्षी जीवन, किटकजीवन आदींचा शास्त्रोक्त अभ्यास आणि संशोधन करण्याची संधी या जैवविविधता केंद्रात मिळणार आहे.

या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी स्मारकाचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांच्यासह या विषयातील अभ्यासक व तज्ज्ञ पार्थ बापट, डॉ. प्रकाश कडलग, डॉ. बालाजी राजभोज, डॉ. गुलाबराव राजे, डॉ. वसंत डोंगरे, सुधीर सावंत, जुई खोपकर, प्रा. राम साळवी, डॉ. बुद्धरत्न भवरे, संदेश कुलकर्णी, प्रा. दिपक क्षीरसागर आदी तज्ज्ञ उपस्थित होते.

कार्यशाळेचे संयोजन पत्रकार सुरेश कराळे यांनी केले होते. राजन इंदुलकर, माधुरी पाटील, राजेश कुलकर्णी, आशुतोष शिर्के, सिरत सातपुते यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply