पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक उपक्रमातून साहित्यिक कवी घडले, हेच कोमसापचे उपक्रम जगण्याला ऊर्जा देतात असे मत कोमसापचे रायगड जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी यांनी कोमसापच्या ऑनलाइन कवी संमेलनाच्या उद्घाटनच्या वेळी केले.
ऑनलाइन कविसंमेलनाचे हे दहावे पुष्प होते. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण होते. कोरोनाचे संकट असताना कवींनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्याची देवाण-घेवाण या ऑनलाइन कवी संमेलनातून केली, यातून साहित्यिक विचार एकमेकांना आदान-प्रदान करता आले, असे अध्यक्ष भाषणातून सुधाकर चव्हाण यांनी सांगितले. या कविसंमेलनाचे नियोजन कोमसाप खोपोली शाखेच्यावतीने करण्यात आले होते.
या कविसंमेलनात चिंतामणी ठाकरे (मोहपाडा), मकरंद वांगणेकर (कल्याण ), सरोज गर्दे (भाईंदर), मकरंद राहाळकर (मोहपाडा), रमेश आहिरे (कर्जत), बाळासाहेब तोरस्कर (ठाणे), भि. रा. पगार े(कर्जत), रोहिदास कवळे (रसायनी) यांनी कविता सादर केल्या. ऑनलाइन कवी संमेलनाची सुरुवात रेखा जगताप यांनी स्वागत गीताने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रवींद्र घोडके यांनी, आत्तापर्यंतच्या संमेलनांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला जांभळे यांनी केले तर आभार प्रकाश सोनवणे यांनी मानले.