Breaking News

मंदिरांतील पुजार्यांना आर्थिक मदत द्यावी

गुरव समाज नेते बंडू खंडागळे यांची मागणी

पेण : प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिरांतील पुजार्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  गुरव समाजाचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या काळात सुमारे वर्षभर राज्यातील मंदिरे बंद होती. त्याची झळ छोट्या-मोठ्या मंदिरातील पुजार्‍यांना बसली होती. त्यावेळी निवेदने देवून, आंदोलने करूनही पुजारी वर्गाला कुठलीही आर्थिक मदत, पॅकेज दिले नाही. आता पुन्हा एकदा करोना महामारीने डोके वर काढले आहे. राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मंदिरामध्ये भक्तगण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. या पुजारी वर्गाला तसेच मंदिराबाहेर छोटे मोठे धार्मिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांना  राज्य शासनाने आर्थिक पॅकेज देऊन सहकार्य करावे, अशी मागणी बंडू खंडागळे यांनी पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply