कर्जत : बातमीदार
तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील 250 आदिवासी शेतकर्यांचे दावे निकाली काढण्यासाठी वन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी वातावरण फाउंडेशन ही संस्था आदिवासी लोकांना मदत करणार आहे.
कळंब ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तात्याचीवाडी या गावाअंतर्गत येणार्या चाहुचीवाडी, बोरीचीवाडी, खालची भागुचीवाडी, वरची भागुचीवाडी, पादीरवाडी, बनाचीवाडी, सुतारपाडा या वाड्यांची एकत्रित ग्रामसभा चाहुचीवाडी येथे घेण्यात आली. या ग्रामसभेला 130 पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. वनहक्क जमिनीबाबत लोकांना न्याय मिळवून देणार्या वातावरण फाउंडेशनचे पदाधिकारी उदयकुमार यांना या ग्रामसभेसाठी निमंत्रीत करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने 250 वैयक्तिक वनहक्कांचे दावे दाखल करण्याचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. त्यासाठी वनहक्क समितीचे पुनर्गठण करण्यात आले. तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या वनहक्क समितीचे अध्यक्ष म्हणून निर्मला निरगुडा, तर सचिव किसन पादीर यांची निवड करण्यात आली. बुधाजी ढोले, परशुराम निरगुडा, रेवती ढोले, काशिनाथ पुंजारा, बाबू ढोले, रमेश पारधी, काशिनाथ निरगुडा, मालु कांबडी, जोत्स्ना दोरे, ज्योती निरगुडा, कृष्णा बदे, राहुल चोणकर यांची वनहक्क समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
वन विभागाचे अधिकारी संदिप चव्हाण, संजय पाटील, बबन राठोड, वातावरण फाउंडेशनचे अधिकारी उदयकुमार, वसंत ढोले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश निरगुडा, निलम ढोले, जानकी पारधी, माजी सरपंच रेवती ढोले, रामा पुंजारा, भरत दोरे, रवी पुंजारा, हरि ढोले, महेश निरगुडा, कृष्णा दोरे, सोमा शीद, काशिनाथ निरगुडा, कमळू ढोले आदिंसह ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते.