Breaking News

पनवेल मनपाची टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा; स्वच्छ सर्वेक्षण 2022

पनवेल : प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिकेतर्फे टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बनवलेली वस्तू ही टाकाऊ वस्तूपासून बनवलेली असावी. या वस्तूची टाकाऊ ते टिकाऊपर्यंतची माहितीसोबत पाठवावी. या स्पर्धेसाठी 10 जानेवारी ही अंतिम तारीख आहे. नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. या स्पर्धेला विषयाचे बंधन नाही. एखाद्या पदार्थापासून ते बागेतल्या कचर्‍याचे व्यवस्थापन ते घरातल्या बाटल्यांना रंगवून पुनर्वापरापर्यंत कोणतीही कलाकृती यामध्ये समाविष्ट करता येईल. स्पर्धक हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक असावा. या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येतील. स्पर्धेमध्ये वैयक्तिक अथवा ग्रुपमध्ये सहभागी होता येईल. बनविण्यात आलेल्या वस्तूंचे 20 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज मैदान, पनवेल येथे प्रदर्शन भरविण्यात येऊन परीक्षणाद्वारे निकाल जाहीर करण्यात येतील. पारितोषिक वितरण सोहळा 26 जानेवारी रोजी करण्यात येईल. स्पर्धकांना ऑनलाईन पद्धतीने महानगरपालिका मुख्यालय (स्वच्छ भारत अभियान कक्ष) किंवा आपल्या नजीकच्या प्रभाग समिती कार्यालयात, नगरसेवक कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध होतील. तेथेच प्रवेशिका जमा करू शकतील. या स्पर्धेसाठी ग्रुप, वैयक्तिक स्तरावर पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी हीींिीं://लळीं.श्रू/3ीण7थधॠ या लिंकवरही रजिस्टर करू शकता.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply