Breaking News

आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण

मुंबई ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवार (दि. 3)पासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
नवीन वर्षात केंद्र सरकार देशातील मुलांसाठी लसीकरण सुरू करीत आहेत. सुरुवातीला 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी कोविन पोर्टलवर किंवा अ‍ॅपवर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून सोमवारपासून लस दिली जाणार आहे. मुलांकडे आधार कार्ड नसेल तरीही ते फक्त दहावीची गुणपत्रिका आणि आयडी कार्ड वापरून नोंदणी करून लसीकरणासाठी स्लॉट बुक करू शकतात. याकरिता सन
2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील.
देशात लहान मुलांसाठी भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात या वयोगटातील सुमारे 10 कोटी मुले आहेत. या मुलांना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोवॅक्सिन टोचल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देता येतो. त्यामुळे मुलांचे लसीकरण हे त्यांनी पहिला डोस घेतल्यावर एका महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply