Breaking News

१ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर

प्रत्येक शिबिरार्थीला सेवा देण्यासाठी कटिबद्ध -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन १ ऑक्टोबरला करण्यात आले असून प्रत्येक शिबिरार्थीला सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी (दि. १९) येथे दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील पहिली नियोजन बैठक मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीस भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष संदिप पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, संगिता कांडपाळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, अमित जाधव, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कामगार नेते रवी नाईक, संजय भगत, अनेश ढवळे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी,नेत्र तपासणी व चष्मे वाटप, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात येणार आहे. दरवर्षी १५ हजारहून अधिक नागरिक या महाशिबिराचा लाभ घेत असतात, त्यामुळे नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी सर्व गठीत समित्यांनी आपआपली जबाबदारी नेहमीप्रमाणे योग्यरीत्या पार पाडावी, असे आवाहनही अरुणशेठ भगत यांनी यावेळी केले तसेच पुढील आठवड्यात पुढील नियोजन बैठक होणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

महाशिबिरात येणाऱ्या प्रत्येक शिबिरार्थीच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. आरोग्य विषयक विविध तपासण्या, तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला, तसेच औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. आरोग्य संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने महाशिबिराचे नियोजन असणार आहे.
-परेश ठाकूर, सचिव, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ

गेली १४ वर्षे आरोग्य महाशिबीर मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीपणे पार पडले आहे. यंदाचे महाशिबीर यशस्वी करण्याकरिता ३० विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तयारीला सुरुवात झाली असून प्रत्येक समितीचा आढावा घेतला जाणार आहे.
-जयंत पगडे, अध्यक्ष, पनवेल शहर भाजप

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply