पनवेलमधील मोहोत नामफलकाचेही अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील मोहो येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, तसेच मोहोचा पाडा येथे अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या शाळा आणि अंगणवाडीचे उद्घाटन रविवारी (दि. 1) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले तसेच या वेळी त्यांच्या हस्ते श्री सद्गुरू कृपा समर्थ मंडळाच्या नामफलकाचे अनावरण झाले.
पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. अशाच प्रकारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील मोहो येथील जिल्हा परिषद शाळेची चार लाख रुपये निधी खर्च करून दुरुस्ती करण्यात आली आहे. या शाळेचे भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील आणि जि. प. सदस्य अमित जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे मोहोचा पाडा येथे आठ लाख 50 हजार रुपये निधीतून अंगणवाडी बांधण्यात आली असून या अंगणवाडीचे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला भाजपचे किशोर सुरते, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, भाजप नेते राजेश पाटील, सरपंच अशोक पवार, उपसरपंच प्रवीण पाटील, माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच संतोष शेळके, प्रमोद म्हात्रे, मच्छिंद्र भोईर, मोतीराम पाटील, श्री सद्गुरू कृपा समर्थ मंडळाचे अध्यक्ष चाहू म्हात्रे, सचिव तुकाराम म्हात्रे, श्याम पाटील, अनंता पाटील, वामन म्हात्रे, नामा म्हात्रे, बाबूराव म्हात्रे, मारुती शेळके, अरविंद म्हस्कर, नितीन मोरे, विठ्ठल भोईर, बबन भोईर, जयेश पाटील, संजय पाटील, दिलीप म्हस्कर, भरत पाटील, तुळशीराम पाठे, प्रशांत म्हात्रे, भानुदास पाटील, भास्कर पाटील, सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.