खोपोली : प्रतिनिधी
गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोविड प्रादुर्भावामुळे आगारात विश्रांती घेत असलेल्या खोपोल नगर परिषदेच्या शहर परिवहन सेवेची बस सोमवारी (दि. 10) अखेर रस्त्यावर धावली.
शहर परिवहन सेवेची बस सुरू करावी, यासाठी विविध संघटना, राजकीय पक्षांनी खोपोली नगर परिषदेला निवेदने दिली होती. शाळा, कॉलेज सुरू झाल्यामुळे विद्यार्थी खाजगी वाहनांनी खोपोलीत येत होते, त्याच्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. दरम्यान, खालापूर जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी मुख्याधिकारी अनुप दूरे यांची भेट घेऊन ही बस सेवा सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्याधिकार्यांनी थेट ठेकेदाराची फोनवरून चर्चा केली. त्या वेळी 8 जानेवारी रोजी बस सुरू करणार, असे आश्वासन ठेकेदाराने दिले होते, मात्र दोन दिवस उशिरा का होईना बस सेवा सोमवारी सुरू झाली. त्याचे खोपोलीसह ग्रामीण भागात स्वागत करण्यात येत आहे.