कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. यामुळे मोठे आर्थिक-सामाजिक बदल घडले. मात्र शासनाने सावधगिरीने उपाययोजना केल्या आणि जनजीवन पूर्ववत होऊ लागले. शासनाच्या विशेष प्रयत्नातून मोठ्याप्रमाणात होणारे नुकसान टाळता आले. जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते, तेव्हा प्रचंड काळजी वाटते. तर जेव्हा संख्या कमी होऊ लागते, तेव्हा आपण निश्चिंत होतो. ही मानसिकता बदलावी लागेल. गाफील राहू नका, कोरोना अद्याप संपलेला नाही. दरवर्षी कोरोनाचे नवनवीन उत्परिवर्तन तयार होत आहेत. यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे. कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. यामुळे सार्यांची काळजी वाढली आहे. या नव्या इ.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन – जाळलीेप हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश थकज ने ’तरीळरपीं ेष उेपलशीप’ म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका प्रांतामध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आता जगभरातील अनेक देशांमध्ये आढळू लागले आहेत. आपल्या राज्यातही परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे रुग्ण वाढत आहेत.
हा नवा विषाणू किती वेगानं पसरतो? त्याची क्षमता आणि लसीपासून मिळालेल्या संरक्षणाला बायपास करण्याची त्याची क्षमता किती आहे? आणि यावर तातडीने काय उपाय करावे? असे प्रश्न सध्या सर्वांसमोर आहेत. या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल -म्युटेशन्स झाल्याचं आढळलं आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलं आहे. या विषाणूच्या संसर्गाची क्षमता वाढण्याची शक्यता असल्यानं, काळजीचं कारण असू शकतं. यात एका व्यक्तीकडून दुसर्याला संसर्ग होण्याची क्षमताही वाढलेली असू शकते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित यंत्रणेतही त्याची वाढ झालेली असू शकते, अशी शक्यता दक्षिण आफ्रिकेच्या विद्यापीठातील प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कोविडचा संसर्ग झाला होता. याठिकाणी पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण 24 टक्के होते. यापेक्षा अधिक लसीकरणाचं प्रमाण असलेल्या देशांमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग कसा पसरेल हेही यावरून स्पष्ट होत नाही.
पहिला गट म्हणजे शाळेतील मुलं ज्यांना अद्याप लस देण्यात आलेली नाही. पण तुलनेनं त्यांना धोका कमी आहे. तर दुसरा गट धोकादायक वयोगटातील आहे. त्यांना सध्या बूस्टर डोस दिले जात आहेत. 3 जानेवारीपासून शासनाने 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
प्रत्येक देश हा संसर्गजन्य रोगाकडे एक संकट म्हणून पाहत आहे. यापूर्वीच कोरोनासारख्या रोगाला संपूर्ण जगात महामारी घोषित करण्यात आले आहे. या रोगामुळे होणार्या मृतांचा आकडा प्रचंड मोठा आहे. परंतु या सर्व परिस्थितीला मानव स्वत: जबाबदार आहे. मानवाने निसर्गाच्या जीवनचक्रात किती हस्तक्षेप केला आहे, याचा त्याला विसर पडला आहे. आपण सृष्टीच्या जीवनचक्रात जितकी ढवळाढवळ करु तितकीच साथीच्या रोगांची शक्यता भविष्यात वाढत जाणार हे विसरता कामा नये.
सध्या आणि भविष्यात संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी पुढील नियम आपण स्वत: पाळणे खूप गरजेचे आहेत.
आपले हात वारंवार साबणाने आणि पाण्याने धुवा. साबणाने आणि पाण्याने आपले हात धुण्याने आपल्या हातावरील विषाणू नष्ट होतात.
सामाजिक अंतर कायम ठेवा. प्रत्येकामध्ये कमीतकमी 1 मीटर (3 फूट) अंतर ठेवा. जेव्हा कोणाला खोकला किंवा शिंक येते तेव्हा त्यांच्या नाकातून किंवा तोंडातून लहान विषाणूरहीत द्रव थेंब बाहेर फेकले जातात. जर तुम्ही खूप जवळ असाल तर तुमच्या श्वासातून हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतो.
डोळे, नाक आणि तोंड यांना विनाकारण वारंवार स्पर्श करू नका का? आपण आपले हात इतरत्र वावरतांना वेगवेगळया पृष्ठभागास स्पर्श करतात आणि विषाणू आपल्या हातांना लागू शकतात. अशावेळी विषाणूरहीत हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श झाला तर विषाणूंचे संक्रमण होऊ शकते.
श्वसनाच्या स्वच्छतेचा सराव करा. आपण आणि आपल्या आसपासच्या लोकांना, श्वसनाच्या चांगल्या स्वच्छतेचे अनुसरण करायला सांगा. याचा अर्थ असा की जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा आपले तोंड आणि नाक आपल्या वाकलेल्या कोपर किंवा रुमालाने झाकून घ्या. मग वापरलेल्या रुमालाची त्वरित विल्हेवाट लावा. श्वसनाच्या चांगल्या सवयींचे पालन करून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी, फ्लू आणि कोविड-19 सारख्या विषाणूंपासून वाचवू शकतो.
जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर लवकर वैद्यकीय सेवा मिळवा. जर आपल्याला बरे वाटत नसेल तर घरी रहा.
आपल्या स्थानिक आरोग्य प्राधिकरणाच्या निर्देशांचे अनुसरण करा. आपल्या भागातील परिस्थितीविषयी राष्ट्रीय आणि स्थानिक अधिकार्यांकडे अद्ययावत माहिती असेल. ते आपल्याला त्वरित योग्य मार्गदर्शन करतील यामुळे व्हायरस आणि इतर संक्रमणांचा प्रसार रोखण्यास मदत हेईल.
भविष्यात संसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी समस्त मानव जातीने पर्यावरणाचे, निसर्गातील जीवसृष्टीचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. अधिकाधिक झाडे लावणे, प्रदूषणाला आळा घालणे या सर्व गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. आपले आरोग्य निरोगी कसे राहील, याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे, भविष्यात कोरोनासारखे संसर्गजन्य रोग उद्भवतीलच हे लक्षात ठेऊन स्वत:चे, समाजाचे व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सक्षम राहणे गरजेचे आहे.
जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते तेव्हा आम्हाला प्रचंड काळजी वाटते. तर जेव्हा संख्या कमी होऊ लागते तेव्हा आम्ही निश्चिंत होतो. असे गाफील न राहता सावध राहा. शासन यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करीत आहे. शासनाने घातलेले निर्बंध सर्वांनी पाळले पाहिजेत. शासनाच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सावध रहा. काळजी घ्या. गर्दी टाळा एवढेच आपण करू शकतो आणि शासनाच्या सर्व प्रयत्नामध्ये सहभागी होऊ शकतो. शासन या रोगाचा अटकाव करण्यासाठी सर्व तर्हेने प्रयत्न करीत आहे. आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे एवढेच.
-प्रविण डोंगरदिवे,माहिती सहायक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई