Breaking News

‘रोटरी’तर्फे मोहोपाडा तलाव परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने मोहोपाडा तलावातील प्लास्टिक, बाटल्या, निर्माल्य व जलपर्णी दूर करून साफ सफाई तसेच तलावानजीकच्या परिसरात सफाई मोहीम राबविण्यात आली. यात रोटरी सदस्यांकडून श्रमदान करण्यात आले व तलावातील कचर्‍याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष रोटरीयन अमित शाह, क्लब सेक्रेटरी रोटरीयन डॉ धीरज जैन, सहायक सेक्रेटरी विजय पाटील, माजी अध्यक्ष बाळकृष्ण होणावळे, सुनील भोसले, रमाकांत कोरडे, ऋतुजा भोसले, गणेश म्हात्रे, शानबाग सर, मेघा कोरडे, वर्षा पाटील, प्रतीक्षा कुरंगले, फर्स्ट लेडी मित्तल शाह, मनोहर पाटील व रोट्रॅक्ट प्रेसिडेंट समृद्ध उचिल उपस्थित होते. उपस्थितांचे अध्यक्ष अमित शाह यांनी आभार मानले.आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी रोटरीच्या या कामाची दखल घेत अभिनंदन केले.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply