स्वच्छतादूतांचे आरोग्य धोक्यात
कर्जत : बातमीदार
नगर परिषदेच्या घंटागाडीत ज्या डब्यांमधून कचरा टाकला जातो, त्या डब्यांची डब्यांची दुरावस्था झाली आहे. कड्या तुटल्यामुळे स्वच्छता दुतांना ते डब्बे आपल्या डोक्यावर उचलून घेऊन त्यातील कचरा घंटागाडीत टाकावा लागतो. अनेकदा त्यातील कचरा अंगावर पडत असल्याने स्वच्छता दुतांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र कर्जत नगर परिषदेतील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छता दूतांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ते टाळण्यासाठी कर्जत नगर परिषदेने नवीन कचरा डबे उपलब्ध करून घ्यावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.