अलिबाग : शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून अलिबाग येथील पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयातील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात अधिकारी, कर्मचार्यांचा समावेश आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसाला दीड ते दोन हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. रुग्णवाढ रोखण्यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु ती रोखण्यात यश आलेले दिसत नाही. आता सरकारी कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आलेल्या चाचणीत सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …