Breaking News

सुरक्षेतील तृटींविरोधात व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ कामोठ्यात स्वाक्षरी मोहीम

कामोठे : रामप्रहर वृत्त

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत ज्या राज्यात त्यांचा दौरा होता त्या पंजाबमधील काँग्रेस सरकारने बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली. त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करुन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहोत या साठी कामोठे भाजपच्या वतीने नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

भाजपच्या कामोठे येथील कार्यालयात झालेल्या या मोहीमेच्या वेळी प्रभाग समिती ‘क’ सभापती अरुणा भगत, कामोठे शहर रविंद्र जोशी, नगरसेवक दिलीप पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसूम म्हात्रे, रवि गोवारी, रवि म्हात्रे, महिला मोर्चाच्या वनिता पाटील, रावसाहेब बुधे, नाना मकदुम, उत्तम जाधव, मोहन जोशी, प्रदिप भगत, शरद जगताप, वैशाली कदम आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply