Wednesday , June 7 2023
Breaking News

टीआयपीएलच्या कर्मचार्यांसाठी पाडेघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. (टीआयपीएल) यांच्या पुढाकाराने व अष्टविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून टीआयपीएल पाडेघर येथे शनिवारी (दि. 22) कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटल येथील डॉ. बाळाजी ग्यानराव (बीएचएलएस), डॉ. श्री सागर तांडेल (डीएम कार्डिओलॉजीस्ट), डॉ. श्री प्रशांत तांडे (एमएस ऑर्थो) व स्टाफ आणि सोबत टीआयपीएल पाडेघरचे मॅनेजर जे. एच. घरत व एचआर हेड एस. जी. थवई उपस्थित होते. या शिबिरास टीआयपीएलच्या कर्मचारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply