Breaking News

प्रा. एन. डी. पाटील यांना आदरांजली

कामोठे : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे 17 जानेवारीला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्याकरीता कामोठे येथील ‘रयत’च्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शोकसभेचे आयोजन शनिवारी (दि. 21) करण्यात आले होते. या शोकसभेत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

या शोक सभेला उद्योजक जे. एम. म्हात्रे, नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक दशरथ भगत, विश्वनाथ कोळी, कामगार नेते सुरेश पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. गणेश ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, आर. पी. ठाकूर, सहाय्यक इन्सपेक्टर शहाजी फडतरे, मॅनेजिंग कौंन्सिलच्या माजी सदस्य संजिवनी म्हात्रे, आजीवन सदस्य प्रमोद कोळी, पळस्पे स्कूल कमिटी सदस्य रवी चोरघे, बी.डी.कारंडे यांच्यासह सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply